For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून बेंगळूर-बेळगाव विशेष एक्स्प्रेस

12:43 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून बेंगळूर बेळगाव विशेष एक्स्प्रेस
Advertisement

बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी यशवंतपूर-बेळगाव-यशवंतपूर या मार्गावर स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. या एक्स्प्रेसमुळे गणेशभक्तांना बेंगळूरहून बेळगावला पोहोचणे सहज शक्य होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी व गणेश चतुर्थीनंतर या एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत. रेल्वे क्र. 06555 व 06556 ही एक्स्प्रेस 5 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 वा. बेंगळूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 वाजता बेळगावला पोहोचेल तर 6 रोजी रात्री 8.45 वा. बेळगावहून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी 8 वा. बेंगळूरला पोहोचेल. तर रेल्वे क्र. 06557 व 06558 एक्स्प्रेस 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.15 वाजता यशवंतपूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 10.15 वा. बेळगावला पोहोचेल. ही एक्स्प्रेस 8 रोजी सायंकाळी 5.30 वा. बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वा. बेंगळूरला पोहोचेल. या एक्स्प्रेसला तुमकूर, अरसीकेरे, बिरुर, दावणगेरी, हरिहर, हावेरी, हुबळी, धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर असे थांबे देण्यात आले आहेत. एकूण 22 डबे जोडण्यात आल्याने गणेशभक्तांना गावी पोहोचणे सोयीचे होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.