For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांना दणका

10:45 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांना दणका
Advertisement

शोधमोहीम हाती, पथकाची नियुक्ती : बेकायदेशीर कार्डधारकांवर होणार कारवाई

Advertisement

बेळगाव : बेकायदेशीर कागदपत्रे पुरवून बीपीएल कार्डे मिळविणाऱ्यांना दणका बसणार आहे. अपात्र बीपीएल कार्डे रद्द करून त्यांचे रुपांतर एपीएल कार्डात होणार आहे. यासाठी जिल्हा पातळीवर एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून बोगस कार्डे रद्द केली जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार काहीसा कमी होणार आहे. सरकारकडून बेकायदा बीपीएल कार्डधारकांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात 70 टक्के नागरिकांकडे बीपीएल कार्डे असल्याचे समोर आले आहे. यापैकी बहुतांशी बीपीएल कार्डे बेकायदेशीरपणे मिळविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा कार्डधारकांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. अनेकांनी नियमबाह्या पद्धतीने बीपीएल कार्डे मिळविली आहेत.

अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदळाऐवजी प्रति व्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी बेकायदेशीरपणे बीपीएल कार्डे मिळविली आहेत. बीपीएल कार्डासाठी असणाऱ्या नियमानुसार आणि निकषाच्या आधारावर एपीएल आणि बीपीएल असे वर्गीकरण केले जाणार आहे. शिवाय यामध्ये आढळून येणाऱ्या बेकायदेशीर बीपीएल कार्डधारकांवर कारवाई केली जाणार आहे. सहा महिन्यांत एकदाही रेशन न घेतलेल्या कुटुंबीयांचाही शोध घेतला जात आहे. अशांची कार्डे रद्द केली जाणार आहेत. काहींनी वार्षिक उत्पन्न 1 लाख 30 हजारापेक्षा अधिक असूनदेखील नियमबाह्यापणे बीपीएल कार्डे मिळविली आहेत. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांचा शोध घेऊन कार्डे रद्द केली जाणार आहेत.

Advertisement

बीपीएलऐवजी एपीएल कार्डे दिली जाणार

खोटी कागदपत्रे सादर करून बीपीएल कार्डे मिळविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनदेखील काहींनी बेकायदेशीरपणे बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांची कार्डे रद्द केली जाणार आहेत. शिवाय त्यांना एपीएल कार्डे दिली जाणार आहेत.

-मल्लिकार्जुन नायक, (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)

Advertisement
Tags :

.