बंदरजेटी स्टॉल हटाव मोहिम नारायण राणेंच्या सूचनेवरून थांबली
स्टाॅलधारकांनी मानले निलेश राणे यांचे आभार
मालवण / प्रतिनिधी
मालवण बंदर जेटी या ठिकाणी वर्षानुवर्ष तात्पुरते स्टॉल उभारून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे स्टॉल हटवण्याची कारवाई गुरुवारी सकाळी मोठा फौजफाटा घेऊन बंदर विभागाकडून करण्यात येत होती. याबद्दल व्यावसायिक यांनी तात्काळ माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. श्री राणे यांनी यावेळी तुमच्यावर अन्याय होणार नाही, मी तुमच्या पाठीशी राहणार आहे असे आश्वासन दिले. दरम्यान श्री. राणे यांनी तात्काळ बंदर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून संबंधित स्टॉल धारकांना विस्थापित न करता त्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच आज सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबण्यात यावी अशी सूचना केली. यावर बंदर विभागाने आपली कारवाई तात्काळ थांबवली. यामुळे बंदर विभागाच्या कारवाईमुळे नाराज झालेल्या स्टॉलधारकांनी नारायण राणे व निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.यावेळी बाबा मोंडकर, बाबा परब, सुदेश आचरेकर, पूजा सरकारे, अशोक तोडणकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, राजू बिड्ये तसेच इतर उपस्थित होते.