राज्यस्तरीय काव्यगायन व हस्ताक्षर स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचे वर्चस्व
प्रतिनिधी
बांदा
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या काव्य वाचन व हस्ताक्षर स्पर्धेत बांदा नं.१ केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सुयश प्राप्त करून राज्य स्पर्धेत सर्वाधिक नंबर मिळवत शाळेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.राज्यभरातून या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरी या गटात चंद्रकांत सदानंद पावसकर याने द्वितीय, तिसरी ते चौथी गटात तिसरी ते सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने प्रथम, दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने द्वितीय, स्वामिनी लक्ष्मण तृतीय तर समर्थ सागर पाटील याने उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले तर पाचवी ते सहावी या गटात नील नितीन बांदेकर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, केंद्र प्रमुख संदीप गवस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना पदविधर शिक्षिका स्नेहा घाडी, रसिका मालवणकर,, शांताराम असंख्य,रंगनाथ परब,जे.डी.पाटील,प्रदिप सावंत, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.