For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुपौर्णिमेनिमित्त बांदा–आदमापूर विशेष बससेवा

गुरुपौर्णिमेनिमित्त बांदा–आदमापूर विशेष बससेवा
Advertisement

सावंतवाडी | शहर वार्ताहर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी आगारातून गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, २९ जुलै रोजी बांदा–आदमापूर विशेष बस सोडण्यात येणार आहे. आदमापूर येथील प्रसिद्ध श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी आगारातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

ही विशेष बस २९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता बांदा बसस्थानकातून सुटेल. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता सावंतवाडी बसस्थानकातून प्रस्थान करून आंबोली, आजरा, उत्तुर व गारगोटी मार्गे दुपारी १२.३० वाजता आदमापूर येथे पोहोचेल. दर्शनानंतर दुपारी २.३० वाजता ही बस आदमापूर येथून परतीच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे.

या बसच्या प्रवासासाठी महिला व इतर सवलतधारक प्रवाशांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्यात आली असून, त्यांच्यासाठी अर्धे तिकीट १४५ रुपये आहे. इतर प्रवाशांसाठी पूर्ण तिकीट २७० रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या विशेष बस सेवेचे आरक्षण सुरू असून, जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी बसस्थानक प्रमुख सौ. गौतमी कुबडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.