महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाणस्तारी अपघातप्रकरणी : सात जणांवर आरोपपत्र

12:19 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 121 साक्षीदारांच्या जबानी : गेल्यावर्षी ऑगस्टमधील अपघात

Advertisement

फोंडा : बाणस्तारी येथील ‘मर्सिडीज हिट अॅन्ड रन’ या राज्यातील सर्वाधित चर्चेतील अपघातप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी एकूण 7 जणांविरोधात फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणात एकूण 121 साक्षीदारांच्या जबानी नोंद केल्या आहेत. संशयित आरोपी परेश सावर्डेकर, आम आदमी पार्टीचे गोवा निमंत्रक अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्यो, विष्णू तारकार, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांची नावे असून त्यांनी परेश सावर्डेकर याला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. म्हार्दोळ पोलिसस्थानकाच्या हद्दीत बाणस्तारी पुलावर 6 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास घडलेल्या या अपघाताने संपूर्ण गोवा हादरून गेला होता.  या अपघातात तिघांचा मृत्यू आणि 4 जण गंभीर जखमी तर 4 जण किरकोळ जखमी झाले होते.

Advertisement

 परेश होता दारुच्या नशेत 

उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बाणस्तारी पुलावर झालेल्या अपघातात मर्सिडीज कार  जीए-07-के-7311 चा आरोपी चालक परेश रा. आत्माराम सिनाई सावर्डेकर (48)  हा दारूच्या नशेत, बेदरकारपणे कार चालवत हेता. फोंड्याहून पणजीच्या दिशेला जात असताना बाणस्तारी पुलावर आल्यावर रस्त्याचा दुभाजक ओलांडून उजव्या लेनमध्ये जात समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकल आणि अल्टो कारला धडक दिली. धडकेमुळे यामाहा मोटरसायकल स्विफ्ट कारवर आदळली. त्यानंतर मर्सिडीज गाडीची अल्टो कारवर धडक झाली. जी उलट्या दिशेने मागे गेली आणि दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारला धडकली.

अपघातानंतर पळून गेला परेश  

अपघातानंतर मृत झालेल्या तसेच जखमींना वैद्यकीय मदत न देता आणि पोलिसांना माहिती न देता परेश अपघातस्थळावरून पळून गेला होता. त्याने त्याचा चालक गणेश लमाणी याला चालक म्हणून दर्शविण्याचा खोटारडेपणाचा प्रयत्न केला. कायदेशीर शिक्षा टाळण्यासाठी त्याने या प्रकरणाची खोटी माहिती पोलिसांना दिली आणि प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे आरोपत्रात म्हटले आहे.

तिवरे-माशेल येथे अत्रेय सावंताच्या घरी शिजला कट

अपघातानंतर तिवरे माशेल येथील अत्रेय सावंत यांच्या घरी हा कट रचण्यात आला. आरोपी परेश सावर्डेकर, अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजित शेट्यो, विष्णू तारकार, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांनी परेश सावर्डेकर याला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने कट रचला. मर्सिडीज गाडीचा चालक गणेश लमाणी याला अटक करण्यात आली. संशयितांनी पुरावे गायब केले, गुह्याची खोटी माहिती म्हार्दोळ पोलिसस्थानकात देऊन तपासाची दिशाभूल केली.

गणेश लमाणी बनला तोतया ड्रायव्हर 

आरोपी गणेश लमाणी याने परेश सावर्डेकरच्या सांगण्यावरून तोतया ड्रायव्हर म्हणून काम करण्याचे मान्य केले आणि त्याद्वारे मुख्य आरोपी परेश सावर्डेकरला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या हेतूने त्याला आश्रय दिला.

अनेक कलमांनुसार आरोपपत्र दाखल

याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी संशयित आरोपी परेश सावर्डेकर, अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजीत शेट्यो, विष्णू तारकार, अत्रेय सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांच्यावर कलम 279, 304, 337, 338, 201, 203, 212 बी, भारतीय दंड संहितेच्या 121-140 अन्वये दंडनीय गुन्हा नोंद केला आहे. 134(अ) आणि 134 (ब), मोटार वाहन कायदा 185 आणि मोटार वाहन (ड्रायव्हिंग) विनियम 2017 चे नियम 6 आणि 77 नुसार आरोपींविऊद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article