महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळंगूटमधील 13 ही बेकायदेशीर डान्स बारना टाळे ठोका

11:59 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश : बेकायदा डान्स बारमधून चालतोय वेश्याव्यवसाय

Advertisement

पणजी : पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगुट भागात चोरीछुपे आणि खासगी मालकीच्या जागेत बेकायदेशीर डान्सबार चालत असल्यास त्यांची पाहणी करून परवाने नसलेल्या डान्सबारना टाळे ठोका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. गोवा खंडपीठात कळंगुट भागात अवैधरित्या डान्स बार चालत असल्याबद्दल सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणवेळी काल बुधवारी हा आदेश देण्यात आला. डान्सबार चालवणाऱ्या संबंधितांकडे स्थानिक ग्राम पंचायत तसेच सरकारच्या अन्य खात्यांची परवानगी नाही. याशिवाय त्यांनी कायदेशीर नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे, या व्यवसायामुळे सरकारला कोणताच महसूल प्राप्त होत नाही, असे दावे या याचिकेतून करण्यात आले आहेत.

Advertisement

 तब्बल 13 बेकायदेशीर डान्स बार

याचिकादाराने आपल्या दाव्यात कळंगुट भागातील 13 बेकायदेशीर डान्सबार कार्यरत असल्याचे नमूद करुन त्यांच्या नावासह यादी न्यायालयास सादर केली आहे. या यादीत नॉर्मा पब, शिल्ड /नेक्स्ट लेवल, मेहफील, डेवील्स क्लब, थ्री किंग्स, क्लब ताओ, 39 स्टेप्स, पॉश नॉश, छावला दिल्लीवाला, ब्लॅक हार्ट, ट्रॉपीकल 247, को•ा आणि प्लॅटीनियम लीफ रेस्ट यांचा समावेश आहे.

 डान्स बारमधून वेश्याव्यवसाय

या अवैध डान्स बारमध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्राहकांकडून एक ते पाच हजार ऊपये आकारले जात असून पर्यटकांना लुटले जात आहे. डान्स बारमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची किंवा नृत्य कलाकारांची नोंदणी स्थानिक पोलीस स्थानकात केलेली नाही. डान्सबारच्या आड तेथे वेश्याव्यवसाय तसेच इतर अनैतिक कृत्ये होत आहेत. असे अनेक मुद्दे याचिकेत नमूद करण्यात आले आहेत.

 कोणीच दखल घेत नाही

याचिकादारांनी स्थानिक पंचायत तसेच इतर सरकारी यंत्रणांकडे तक्रार दाखल करूनही कोणी कारवाई करत नसल्यामुळे जनहित याचिका दाखल केली आहे. कळंगुट परिसरात पाहणी करून बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेले डान्स बार बंद करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

 अनेक खाती, प्राधिकरणे प्रतिवादी

याचिकेत राज्य सरकार, पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा पोलीस तथा पर्यटन विभागाचे उपअधीक्षक, कळंगुट पोलीस निरीक्षक, कळंगुट पंचायत, अबकारी खाते, राज्य कर आयुक्त, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत खाते संचालक, बार्देश गटविकास अधिकारी (बीडीओ), नगरनियोजन खाते, अग्निशामक दल, अन्न व औषध प्राधिकरण यांच्यासह 13 डान्स बार मालकांना प्रतिवादी करण्यात आले आहेत.

बाहेरून बार अँड रेस्टॉरंट... आतून डान्स बार

गोव्यात डान्स बार चालविण्यास बंदी असतानाही, अधिकतर डान्सबार बाहेरून क्लब किंवा बार अँड रेस्टॉरन्टच्या नावाखाली चालत आहेत. या आस्थापनांच्या नोंदणी क्रमांकाखाली हा बेकायदेशीर व्यवसाय  सध्या सुऊ असून रेस्टॉरन्टच्याच  खासगी जागेत खुलेआम ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मूळ मालकाच्या नावे असलेले क्लब अथवा बार अँड रेस्टॉरन्ट तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे भाडे तत्वावर चालविण्यात येत आहेत. मद्यविक्रीसाठी देखील हीच युक्ती वापरण्यात आली असून मालकाच्या नावे अबकारी खात्याचा असलेला परवाना डान्सबारसाठी बिनधास्तपणे उपयोगी आणला जात आहे. काही डान्सबारच्या मालकांच्या नावे गुह्यांची नोंद झाली असल्याने त्यांना पोलीस मंजुरी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मूळ मालक किंवा स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत घेऊन बार अँड रेस्टॉरंटच्या परवान्याचे नूतनीकरण करून सरकारच्या डोळ्यात धूळ फेकली जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article