For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिंचली मायाक्का यात्रेत मद्य विक्रीवर बंदी घाला

11:18 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
चिंचली मायाक्का यात्रेत मद्य विक्रीवर बंदी घाला
Advertisement

प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी 

Advertisement

बेळगाव : चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्कादेवी यात्रेच्या निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रयत संघ-हरित सेनेने केली आहे. सदस्यांनी मंगळवार दि. 3 रोजी प्रादेशिक आयुक्त यांच्या कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. चिंचली येथे मायाक्कादेवी यात्रेला रविवार दि. 1 पासून सुऊवात झाली असून ही यात्रा 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या भागातील ही प्रसिद्ध यात्रा असून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत आहेत. यात्रा सुरळीतपणे व शांततेत होण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात यावेत. उच्च न्यायालयाच्या धारवाड विभागाने मद्यविक्री निर्बंधाचा आदेश 31 जानेवारीला जारी केला आहे. आदेशाचे पालन होण्याकडे प्रादेशिक आयुक्ताने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.