महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंचगंगा, भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी !

04:02 PM Feb 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
Water Irriration
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.
भोगावती नदी- कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील ठाणे-आळवे को.प.बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्या पर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदी पर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावर नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात 2 ते 3 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

Advertisement

पंचगंगा नदी - कार्यवाहीचा भाग- पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात 4 ते 5 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

Advertisement

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही. हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
Panchganga Bhogavati riverstarun bharat newsWater Irriration
Next Article