For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणावर तूर्तास बंदी; श्री कृष्णजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

06:44 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणावर तूर्तास बंदी  श्री कृष्णजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

श्री कृष्णजन्मभूमी मथुरा आणि त्याच्या शेजारी बांधण्यात आलेल्या ईदगाहसंदर्भात सुरू असलेल्या जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणावर दिलेला स्थगिती आदेश सध्यातरी लागू राहील असे स्पष्ट करतानाच न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास नकार दिला. मॅनेजमेंट ट्रस्ट शाही मशीद इदगाहच्या समितीने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Advertisement

उच्च न्यायालयाने ज्या ठिकाणी अंतरिम आदेश दिले आहेत, ते सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत लागू राहतील, असे मथुरेच्या बहुचर्चित श्रीकृष्णजन्मभूमी वादावर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने एप्रिल 2024 मध्ये खटला पुन्हा सूचीबद्ध करण्याचे निर्देश देताना खटल्यातील सर्व पक्षांना पुढील अंदाजे तीन महिन्यांत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या शाही इदगाह मशीद संकुलाचा जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मथुरेत स्वतंत्र आणि भव्य मंदिर बांधण्याची मागणी होत आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली सर्वेक्षणाची मागणी सुरू झाली तेव्हा जमिनीच्या मालकीबाबत सुरू असलेल्या खटल्यात महत्त्वाचे वळण आले. इदगाह संकुलाचे सर्वेक्षण करून घेण्यासाठी याचिकाकर्त्यांनी प्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
×

.