For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

06:43 AM Mar 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी
Advertisement

बेंगलोर

Advertisement

कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 2026-27 सालातील अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या प्रकारे पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुलांच्या मोबाईल फोन वापरामुळे आणि डिजिटल व्यसनामुळे होणाऱ्या आरोग्य, मानसिक आणि सामाजिक समस्यांवर चर्चा केल्यानंतर सरकारने एका महत्त्वाच्या टप्प्यावर हा निर्णय जाहीर केला आहे. मुलांकडून सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्याचा आणि त्यांचे आरोग्य, भविष्य सुरक्षित करण्याचा सरकारचा मानस आहे.

आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले होते. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे मुलांना होणारे नुकसान गंभीर आहे. फिनलंड देशाने या संदर्भात कार्यवाही केली आहे, ब्रिटननेही त्याचा विचार केला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या देशात 16 वर्षांखालील मुलांवर सोशल मीडिया वापरावर निर्बंध घातले होते. या धर्तीवर कर्नाटकमध्ये ‘डिजिटल डिटॉक्सिफिकेशन’ आणि ‘बियॉन्ड क्रीन्स’ कार्यक्रमांद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आता 2026-27 च्या कर्नाटक अर्थसंकल्पात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.