For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शिख फॉर जस्टिस’वरील बंदी 5 वर्षांनी वाढली

06:27 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शिख फॉर जस्टिस’वरील बंदी 5 वर्षांनी वाढली
Advertisement

केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला निर्णय : दहशतवादी पन्नूचे वाढले टेन्शन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूची संघटना शिख फॉर जस्टिसवर (एसएफजे) घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी 5 वर्षांनी वाढविला आहे. या दहशतवादी संघटनेवर पहिल्यांदा 2019 मध्ये बंदी घालण्यात आली होती.

Advertisement

एसएफजे भारताची अंतर्गत सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी हानिकारक कृत्यांमध्ये सामील राहिली असल्याचे गृह मंत्रालयाने अधिसूचनेत नमूद केले आहे. एसएफजेच्या कारवायांमध्ये देशाची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याची क्षमता आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने पंजाबमध्ये करण्यात आलेल्या देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये एसएफजेचा सहभाग होता. बंदी वाढविण्याचा निर्णय एनआयएकडून करण्यात आलेल्या तपासात मिळालेल्या नव्या पुराव्यांच्या आधारावर घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.

पंजाब आणि अन्य ठिकाणी उग्रवाद आणि हिंसेचे समर्थन एसएफजेकडून करण्यात आले आहे. तसेच ही संघटना भारतीय क्षेत्राच्या एका हिस्स्याला देशापासून तोडून वेगळा करण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने 2007 साली शिख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना केली होती. खलिस्तान या स्वतंत्र देशाची मागणी करणे हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता. गुरपतवंत सिंह पन्नूला 2020 मध्ये केंद्र सरकारकडून दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.