For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एव्हरेस्ट’च्या हिंग पावडर विक्रीवर बंदी

06:43 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एव्हरेस्ट’च्या हिंग पावडर विक्रीवर बंदी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

एव्हरेस्ट, आणि लालजी गोधू या कंपन्यांच्या हिंग पावडर विक्रीवर केंद्र सरकारच्या ‘एफएसएसएआय’ या संस्थेने बंदी घातल्याची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या हिंग पावडरची गुणवत्ता नियमांच्या प्रमाणे नसल्याने ही बंदी घालण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांची हिंग पावडर आणि हिंग उत्पादने गुणवत्तेत कमी आढळली आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने हा आदेश शनिवारी लागू केला आहे. त्यामुळे ही उत्पादने आता कोणालाही विकता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

एव्हरेस्ट कंपनीची पिवळी आणि काळी हिंग पावडरही गुणवत्तेच्या दृष्टीने कमी आहे. या उत्पादनांच्या प्राधिकरणाने चाचण्या घेतला आहेत. त्या चाचण्यांमध्ये ही उत्पादने खाण्यायोग्य असल्याचे आढळले नाही. लालची गोधू या कंपनीच्या संबंधातही हाच प्रकार घडला आहे. परिणामी, या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या कंपन्यांनी आपल्या हिंग उत्पादनाच्या गुणवत्तेत नियमांच्या अनुसार सुधारणा केली नाही, तर प्राधिकारणाच्या माध्यमातून पुढची कृती केली जाईल, असा इशाराही प्राधिकरणाने या कंपन्यांना नोटीस पाठवून दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.