For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूवर निवृत्तीनंतर बंदी

06:39 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूवर निवृत्तीनंतर बंदी
Advertisement

वृत्तसंस्था, ऑकलंड

Advertisement

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलु आणि वेगवान गोलंदाज 35 वर्षीय डक ब्रेसवेल क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्याच्यावर क्रिकेट न्यूझीलंडने दोन वर्षांची बंदी घातली आहे.

कोकेन या अंमली पदार्थाचे सेवन केल्याच्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई क्रिकेट न्यूझीलंडने केली आहे. तब्बल 12 वर्षे त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 69 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले होते. इंग्लिश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत गेल्या सप्टेंबर महिन्यात इसेक्स संघाकडून खेळताना आपण कोकेन हे अंमली द्रव घेतल्याची कबुली नुकतीच दिली. दोन वर्षांपूर्वी डक ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयानंतर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी क्रिकेट न्यूझीलंड आणि इंग्लिस कौंटी स्पर्धा आयोजकांनी घेतली आहे. 2011 ते 2023 या कालावधीत ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी 28 कसोटी, 21 वनडे आणि 20 टी-20 सामने खेळले असून त्याने या तिन्ही प्रकारात 100 पेक्षा अधिक बळी आणि फलंदाजीत 1000 धावा जमविल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.