Kolhapur Agriculture News | शेतकऱ्यांना दिलासा! दूधगंगा वगळता इतर प्रकल्पांतील उपसाबंदी तीन दिवसांसाठी शिथिल
कोल्हापूर -जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाण्याची उपल्बधता आहे, अशा ठिकाणीची उपसाबंदी शेतीसाठी उठवावी, अशी मागणी मंगळवारी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाकडे केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत बुधवारी, १७ पासून ३ दिवस दूधगंगा धरण वगळता अन्य प्रकल्पात उपसाबंदी शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
'दूधगंगा'वर बंदी अन्य प्रकल्पात उपसाबंदी शिथील
कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, उत्तरच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी थोडे सहकार्य, थोडे नियोजन, असे नमूद करत उपसाबंदी शिथीलचे आदेश सायंकाळी काढले. या आदेशात इरिगेशन फेडरेशन आणि लाभधारक शेतकऱ्यांनी दूधगंगा धरण वगळता अन्य धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतीसाठी १ आवर्तन सिंचनाची मागणी केली, दूधगंगा प्रकल्प वगळता अन्य सर्व नद्यांमधील उपसाबंदी बुधवारपासून शुक्रवारी, १९ पर्यंत ३ दिवस शिथील केली आहे. २० रोजी आढावा घेऊन पुढील आदेश काढण्यात येईल, असे स्पष्ट केले.
त्यानुसार सायंकाळी पाटबंधारे विभागाने आदेशही काढला आहे.पाटबंधारे विभागाने सोमवार, १५ जूनपासून पुढील आदेशापर्यंत शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदी जाहीर केली आहे. गत पर्जन्यवर्षात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला होता, जिल्ह्यातील सर्वच लघु, मध्यम व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी टंचाई भासणार, अशी स्थिती नव्हती. जिल्हयातील सर्वच लघु, मध्यम व मोठी धरणे पूर्ण क्षमतेन भरली होती तर किमान ३० जूनपर्यंत सर्वच घटकांसाठी पाणी पुरले पाहिजे . होते, मग आत्ताच पाणी टंचाई का? याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.
इरिगेशन फेडरेशनची
पाटबंधारे विभागाने सुरुवातीपासून ऑक्टोबरपासून पाण्याचे नियोजन करावे ही मागणी होती. पण पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे गांर्भियाने बघत नाहीत. पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी राजापूर बंधाऱ्यामधून कर्नाटकला लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. कर्नाटकामध्ये उपसाबंदी नाही पण महाराष्ट्रात आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे, असे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.
शेतकऱ्याचे पीक वाळून गेले तर त्याची वर्षभराची मेहनत वाया जाऊन आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे जेथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणची उपसाबंदी ३० जूनपर्यंत उठवावी. येथून पुढे प्रत्येक वर्षी पाण्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरुन -पाटबंधारे विभागाने सुरुवातीपासून ऑक्टोबरपासून पाण्याचे नियोजन करावे ही मागणी होती. पण पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे गांर्भियाने बघत नाहीत. पाटबंधारे नियोजनाअभावी बंधाऱ्यामधून विभागाच्या राजापूर कर्नाटकला लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. कर्नाटकामध्ये उपसाबंदी नाही पण महाराष्ट्रात आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे, असे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.
शेतकऱ्याचे पीक वाळून गेले तर त्याची वर्षभराची मेहनत वाया जाऊन आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे जेथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणची उपसाबंदी ३० जूनपर्यंत उठवावी. येथून पुढे प्रत्येक वर्षी पाण्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरुन शेतीसाठी पाणी किमान ३० जूनपर्यंत पुरेल, याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावेळी कार्यकारी अभियंता उत्तर विभाग ज्योती देवकर उपस्थित होत्या.
पाटबंधारे विभागाच्यावतीने देवकर यांनी जिल्ह्यातील सर्व धरणातील पाण्याची उपलब्धता व पाणीसाठ्याची माहिती घेऊन शासन धोरणानुसार ३१ ऑ गस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे मान्य केले. तसेच उद्यापासून लावलेली उपसा बंदी रद्दकरून ३ दिवस पाणी उपसण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळात माजी आमदार संजयबाबा घाटगे, विक्रांत पाटील-किणीकर, राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीप पाटील, शरद पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील- भुयेकर, चंद्रकांत पाटील पाडळीकर, सुभाष शहापुरे, सखाराम चव्हाण, इंद्रजीत पाटील, सचिन जमदाडे, चंद्रकांत पाटील, भगवान पाटील, सुरेश पाटील, जगनाथ पाटील, आत्माराम चौगले, महादेव सुतार, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.