For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगाई देवी यात्रेदरम्यान पशूबळीवर बंदी

07:57 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगाई देवी यात्रेदरम्यान पशूबळीवर बंदी
Advertisement

  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश जारी

Advertisement

 त. भा.  प्रतिनिधी

बेळगाव : वडगाव येथील मंगाई देवी यात्रेला 11 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. यात्रा शांततेत, सुरळीत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यात्राकाळात मंदिर परिसरासह वडगाव हद्दीत पशूबळीचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार 11 ऑगस्टपासून यात्रा संपेपर्यंत मंदिर परिसरात तसेच वडगावच्या हद्दीत पशू किंवा पक्ष्यांचा बळी देण्यास परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविऊद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement

मंगाई देवी हजारो भाविकांचे आराध्य दैवत असून यात्राकाळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यासाठी सार्वजनिक शांतता, आरोग्य, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. कर्नाटक पशुबळी प्रतिबंध अधिनियम, 1959, त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम 1963 तसेच सुधारणा अधिनियम 1975 नुसार मंदिरांमध्ये देवाच्या नावाने पशू किंवा पक्ष्यांचा बळी देण्यास कायद्याने बंदी आहे. या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

मंगाई देवी यात्रा ही शहरातील पारंपरिक आणि प्रमुख धार्मिक उत्सवांपैकी एक असून दरवषी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये व यात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

नागरिकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे

Advertisement
Tags :

.