For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पेट्रोल-डिझेलशी स्पर्धा करणार बांबू

06:53 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोल डिझेलशी स्पर्धा करणार बांबू
Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायाचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांनी बांबूपासून तेल तयार करण्यास यश मिळविले आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समधील वॉर्सेस्टर पॉलिटेक्निक इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी एका खास पद्धतीने बांबूला तेलासारख्या पदार्थात रुपांतरित केले. प्रयोगशाळेत बांबूला 300 अंश सेल्सिअस तापमानावरक sवळ 10 मिनिटांपर्यंत गरम करण्यात आले. या परीक्षणात बाब्ंाtच्या 35 टक्क्यांहून अधिक हिस्स्याला तेलासारख्या कच्च्या पदार्थात बदलण्यात आले. या तेलाला पुढे साफ करत वाहने, विमाने आणि रेल्वेंमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनात रुपांतरित करता येऊ शकते.

Advertisement

मोठ्या स्तरावर उत्पादन झाल्यास या इंधनाचा खर्च जवळपास 2.75 डॉलर्स प्रतिगॅसोलिन-गॅलनच्या समान येऊ शकतो असा संशोधकांचा अनुमान आहे. याच्यामुळे डिझेलच्या तुलनेत ग्रीनहाउस गॅसेसचे उत्सर्जन 26 पटीने कमी होऊ शकते असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. हे सध्या संशोधन आणि अनुमान आधारित निष्कर्ष आहेत.

बांबूद्वारे तेल कसे ?

Advertisement

संशोधकांनी बांबूपासून तेल मिळविण्यासाठी हायड्रोथर्मल लिक्विफॅक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला. या पद्धतीने पाणी, अधिक उष्णता आणि उच्च दाबाच्या मदतीने रोपांपासून तेलासारखा पदार्थ मिळविला जातो. या परीक्षणात बांबूला 300 अंश सेल्सिअसवर 100 मिनिटांपर्यंत तापविण्यात आले. यासाठी स्वतंत्रपणे कुठल्याही केमिकल कॅटेलिस्टचा वापर करण्यात आलेला नाही.

कॅटेलिस्ट असे पदार्थ असतात, जे कुठल्याही प्रक्रियेला वेगवान करण्यास मदत करतात. परीक्षणात बांबूच्या वजनाचा 35.6 टक्के हिस्सा तेलासारख्या कच्च्या पदार्थात बदलला. परंतु या तेलाला थेट वाहनात टाकले जाऊ शकत नाही. यापासून इंधन मिळविण्यासाठी प्रथम याला साफ करावे लागेल आणि पुढील प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

इंधन निर्मितीचा काय लाभ

बांबूची वाढ वेगाने होते आणि कमी सुपीक जमिनीवरही ते उगवू शकते. याचमुळे वैज्ञानिक याला इंधनाचे रुप देण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. सध्या मक्यासारख्या पिकांपासून जैवइंधन निर्माण केले जाते. परंतु या पिकांना उगविण्यासाठी शेतजमिनीची आवश्यकता असते. संशोधनानुसार बांबूपासून इंधन निर्मितीत मक्याच्या तुलनेत कमी जमीन लागू शकते. संशोधकांच्या अअनुमानात मक्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेसमान इंधन निर्माण करण्यासाठी बांबूच्या शेतीत सुमारे 13 टक्के जमिनीची गरज भासू शकते. परंतु हा संशोधनाच्या आधारावर व्यक्त करण्यात आलेला अनुमान आहे. याला अद्याप मोठ्या स्तरावर करण्यात येणाऱ्या उत्पादनाचा निष्कर्ष मानले जाऊ शकत नाही.

एक गॅलन इंधनासाठी खर्च

मोठ्या स्तरावर उत्पादन सुरू झाल्यावर बांबूपासून निर्मित इंधनाचा खर्च सुमारे 2.75 डॉलर्स प्रति गॅसोलिन-गॅलन म्हणजेच 260 रुपये एका गॅलनसमान असू शकतो. हा इंधननिर्मितीच अनुमानित खर्च आहे. याची तुलना थेट पेट्रोल प्पांवर मिळणारे पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्याशी केली जाऊ शकत नाही. हे इंधन निर्माण करण्यासाठी फॅक्ट्री उभारणे, यंत्रसामग्री आणि बांबू तेथपर्यंत पोहोचविण्यासाठीही पैसे खर्च होतील. याचमुळे मूळ खर्चाचा थांगपत्ता मोठ्या स्तरावर उत्पादन सुरू झाल्यावरच होऊ शकेल.

तुलनेत कमी प्रदूषण

संशोधकांनुसार बांबूपासून निर्मित इंधनाद्वारे डिझेलच्या तुलनेत ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन 26 पटापर्यंत कमी होऊ शकते. ग्रीनहाउस गॅस पृथ्वीवरील तापमान वाढविण्यात योगदान देतात. परंतु या लाभाचा खरा हिशेब लावण्यासाठी बांबू उगविण्यापासून त्याद्वारे इंधन निर्मिती आणि ते जाळण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया पहावी लागणार आहे. यात वापरली जाणारी ऊर्जा आणि इतर कामांपासून होणारे प्रदूषणही मोजणे आवश्यक आहे. बांबूपासून वाहनांमध्ये वापरले जाऊ शकणारे इंधन निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हे संशोधन दर्शविते. परंतु अद्याप याला पेट्रोल आणि डिझेलचा पूर्ण पर्याय मानले जाऊ शकत नाही.

Advertisement
Tags :

.