सिंधुपुत्राला 'मानद डॉक्टररेट' पदवी बहाल
कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे सन्मान.
कुडाळ -
युनियन बँकेचे माजी युनियन प्रमुख तथा या बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी व कुडाळ येथील प्रसिद्ध बांबू उद्योजक आणि बांबू पिकाला व व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कृषीप्रेमी संतोष शिवाजी राणे यांना जळगाव येथील जैन हिल्स येथे आयोजित रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया द्वारा राष्ट्रीय अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ (अमरावती ) यांच्यावतीने 'मानद डॉक्टरेट' पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.बांबू उद्योगाला शाश्वत विकासात्मक दृष्टिकोनातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. संतोष राणे यांना मान्यवरांच्या हस्ते सदर डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक हरिजन सेवक संघ ( नवी दिल्ली ) चे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर कुमार संन्याल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय क्षत्रिय महासभा (दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर हरवंश सिंह, माजी राज्यसभा सदस्य नरेशचंद्र यादव, अखिल भारतीय लोधी व लोधा राजपूत महासंघ (भोपाल) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल राजपूत, कम्युनिटी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (नवी दिल्ली) चे अध्यक्ष अशोक मेहता, खादी ग्रामोद्योग आयोग ( भारत सरकार, मुंबई ) चे संचालक योगेश भामरे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड (जळगाव ) चे अध्यक्ष व यशस्वी उद्योजक अशोक जैन, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुई - खेडकर, समृद्ध विदर्भ समृद्ध भारत (नवी दिल्ली ) चे अध्यक्ष गोविंद पोतदार, निकोलस शुज प्रायव्हेट लिमिटेड नोएडा (उत्तर प्रदेश ) चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप कटियार, सुझकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (नवी दिल्ली ) चे व्यवस्थापकीय संचालक सुझान शंकर, अदिईरा इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड ( विरुधुनगर - तामिळनाडू ) चे संचालक काथिकेयान दुराईराज यांच्यासह रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.श्री. राणे यांनी २०२१ मध्ये युनियन बँकेच्या वरिष्ठ प्रबंधक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेत बांबू उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. आजवर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत बांबू व्यवसायला ग्लोबल दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घेतली आहे. सिंधुदुर्गसह अन्य जिल्हे आणि राज्यांमध्ये अधिकाधिक बांबू लागवड कशी करता येईल ? शेतकऱ्यांना बांबू उद्योगासाठी कसे प्रेरित करता येईल ? यासाठी त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचे उद्बोधन केले आहे.त्यांच्या या एकूण कार्याची दखल घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाच्या ही पदवी बहाल करण्यात आली.श्री. राणे यांच्या या यशाबद्दल कुडाळ - एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर,उद्योजक संजीव कर्पे तसेच कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अन्य पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.