कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Bamboo Cultivation: दीडशे एकरवर सुधारित बांबूची लागवड, शेतकऱ्यांचा पुढाकार

06:44 PM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांबूची शेती करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला

Advertisement

By : सुनील पाटील

Advertisement

आजरा : आजरा तालुक्यात परंपरागत पद्धतीने माणगा जातीच्या बांबू (मेसकाठी) चे उत्पादन घेतले जाते. सुमारे तीन हजार हेक्टरवर बांबू उत्पादन सध्या घेतले जाते. मात्र हे उत्पादन केवळ बांधावर घेतले जात आहे. आता बांबूची शेती करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

बांबू लागवडीची ही चळवळ तालुक्यात सुरू झाली आहे, पेरणोली येथे हिरण्यकेशी बांबू ग्राम शेतकरी गट व चिमणे येथील भूमी शेतकरी गटाची स्थापना करून बांबू लागवडीची मोहिम हाती घेण्यात आली आहेकेंद्र आणि राज्य शासनानेही बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी योजना सुरू केली आहे.

आजरा तालुक्यात यापूर्वीपासून घेतले जाणारे बांबूचे उत्पादन लक्षात घेऊन तालुक्यात बांबू लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. बांबूला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकरीही आता बांबू लागवडीकडे वळला आहे. व्यापारी दृष्टीकोनातून बांबू लागवडीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

गेल्या दोन वर्षात सुमारे 150 एकर क्षेत्रावर नव्या व जगभरात मागणी असलेल्या बांबू ची लागवड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. येथील स्थानिक जातीच्या माणगा बांबू बरोबरच पॉलीमार्फ, ब्रॅन्डी-सी, टुल्डा, न्यूटन, बल्कोबा या नव्या जातीच्या बांबूची लागवडही शेतकरी करू लागला आहे.

शासनस्तरावरून बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून आठ दिवसांपूर्वी आजरा तहसीलदार कार्यालयात बांबू लागवडीबाबत कार्यशाळा पार पडली. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) यांच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे प्रकल्प प्रमुख बांबू संशोधक डॉ. विलास जाधव यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड, बांबूचे पर्यावरणीय महत्व, बांबू उत्पादनातून मिळणारे उत्पन्न याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आजऱ्यात उत्पादीत होणाऱ्या बांबूला कर्नाटकातील संकेश्वर येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. दरवर्षी तालुक्यात बांबू विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल होते. बांधावर लावलेल्या बांबू मधून कोट्यावधींची होणारी उलाढाल लक्षात घेता व्यापारी द़ृष्टीकोनातून बांबू शेती केल्यास उलाढाल निश्चितपणे वाढणार आहे. कमी खर्च आणि कमी श्रमात हे पिक घेता येणार असल्याने शेतकरीही बांबू पिक घेण्याकडे वळला आहे.

बांबू प्रक्रिया उद्योगासाठीही प्रयत्न सुरू

बांबू उत्पादनाबरोबरच बांबू प्रक्रिया उद्योगासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. पेरणोली येथील हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाच्या माध्यमातून अगरबत्ती उत्पादनासाठी मान्यता मिळाली आहे. स्थानिक माणगा जातीच्या बांबूपासून अगरबत्तीसाठी लागणारी कांडी तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. आजवर हा प्रयोग झाला नव्हता. मात्र असा उद्योग सुरू झाल्यास स्थानिक बांबूला आणखी दर मिळणार आहे.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#aajara#shahuwadi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBambooBamboo Cultivation
Next Article