For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pakistan Attacked पाकिस्तानात पुन्हा हल्ला, 9 जवान ठार बलुचिस्तानातील पोलीस चौकी लक्ष्य : 5 जवान बेपत्ता

10:10 PM Jul 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pakistan attacked पाकिस्तानात पुन्हा हल्ला  9 जवान ठार बलुचिस्तानातील पोलीस चौकी लक्ष्य   5 जवान बेपत्ता
Advertisement

► वृत्तसंस्था क्वेटा
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. जियारत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीला लक्ष्य करत गोळीबार केला, या हल्ल्यात एकूण 9 जवान मारले गेले आहेत. तर दहशतवाद्यांनी 5 जवानांचे अपहरण केल्याचे समजते. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त अभियान हाती घेतले, ज्यात 15 दहशतवादी मारले गेले आहेत.

Advertisement

हल्लेखोरांनी पोलीस चौकीला लक्ष्य केले होते. रात्रभर चाललेला गोळीबार अत्यंत भीषण राहिला, ज्यात दोन्ही बाजूने मोठ्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती जियारतचे पोलीस अधीक्षक अब्दुल कुदूस यांनी दिली आहे. तर मांगी भागात दहशतवाद्यांच्या विरोधात राबविण्यात आलेली मोहीम पूर्ण झाली असून यात तहरीक-ए-तालिबान

पाकिस्तानचे 15 दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आला आहे. अपहृत जवानांच्या शोधासाठी मोहीम सुरु करण्यात आली असून पूर्ण भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे बलुचिस्तान प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लगार शाहिद रिंद यांनी सांगितले आहे.

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. हल्ल्यात जीव गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच दहशतवाद विरोधातील लढाईची स्वत:ची प्रतिबद्धता व्यक्त केली आहे. परिसरात तणाव, रस्ते बंद

हल्ल्याचे वृत्त पसरताच जियारत आणि आसपासच्या भागांमध्ये संताप निर्माण झाला. स्थानिक समुदाय, वाहतूकदार, व्यापारी आणि मारले गेलेल्या जवानांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. निदर्शकांनी बलुचिस्तानला पंजाब आणि खैबर पख्तूनख्वाशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे शेकडो प्रवासी बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना फटका बसला. स्थानिक प्रशासनाने स्थिती नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केले आहेत.

Advertisement
Tags :

.