महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सांबरा भागात बळ्ळारी नाल्याला पूर

10:52 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुतगे-मुचंडी संपर्क तुटला : सर्व पिके पाण्याखाली गेल्याने भीती

Advertisement

वार्ताहर/सांबरा

Advertisement

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बळळारी नाल्याला पूर आला आहे. सदर पुराचे पाणी मुतगे-मुचंडी या संपर्क रस्त्यावर आल्याने पहिल्यांदाच दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने दुचाकी व चार चाकी वाहनांना या रस्त्यावरून जाण्यासाठी मज्जाव केला आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरूच असून, बळ्ळारी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. पाण्याचा प्रवाहही दिवसेंदिवस वाढत आहे. पुराचे पाणी थेट मुतगे-मुचंडी या संपर्क स्त्यावरून वाहत आहे.

त्यामुळे येथून येणे-जाणे धोक्याचे बनले असून सर्व वाहनांना येथून जाण्यास बंदी घातली आहे. तरीदेखील काही अति उत्साही वाहन चालक पाण्यातून वाहने घालत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मारिहाळ पोलीस तळ ठोकून आहेत. दररोज कामानिमित्त मुतगे-सांबरा भागातून मुचंडी-कणबर्गी आदी भागात जाणाऱ्या नागरिकांची तसेच मुचंडी भागातून मुतगे-सांबरा भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच हा संपर्क रस्ता असल्याने दोन्ही भागातील लोकांना अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. सध्या नागरिकांना वळसा घालून नियोजित ठिकाणी जावे यावे लागत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article