For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : बलगवडे गावाचा मतदानावर बहिष्कार; मतदान न करण्याचा ठाम निर्णय, नेमकं घडलं काय?

05:34 PM Feb 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   बलगवडे गावाचा मतदानावर बहिष्कार  मतदान न करण्याचा ठाम निर्णय  नेमकं घडलं काय
Advertisement

                                        बलगवडे ग्रामस्थांचा मतदान बहिष्कार

Advertisement

सांगली : तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे २० हजार झाडांची तोड करून २१ एकर क्षेत्रावर आवादा कंपनीचा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.

या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी उपोषण आंदोलन केले होते. त्या वेळी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत प्रकल्पाची जागा बदलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उलट पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत चर्चा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी बलगवडे गाव बंद ठेवण्यात आले असून, दिवसभरात एकही मत नोंदले गेले नाही.

Advertisement

दरम्यान, संबंधित मतदान अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ प्रशासनास माहिती दिली आहे. मात्र उशिरापर्यंत कोणताही अधिकृत निर्णय किंवा निर्देश प्राप्त झाले नव्हते.

Advertisement
Tags :

.