महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बाळेकुंद्री खुर्द ग्रामस्थांतर्फे सांबरा लक्ष्मीदेवीची ओटी भरणे कार्यक्रम उत्साहात

10:30 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

उदो गं आई उदो....चा गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत लक्ष्मी माता की जयच्या घोषात तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बाळेकुंद्री खुर्द येथील समस्त ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी सांबरा गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची खणा नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सांबरा गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा गेल्या 14 मे पासून मोठ्या जल्लोषात सुरू झाली आहे. यात्रेचे औचित्य साधून बाळेकुंद्री खुर्दचे ग्रामस्थ व श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोध्दार कमिटीच्यावतीने बाळेकुंद्री गावातून सवाद्य मिरवुणकीसह सांबरा लक्ष्मीदेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी सकाळी बाळेकुंद्री लक्ष्मी मंदिरात देवीची खणा नारळांनी ओटी भरल्यानंतर गावातील सर्व देवदेवतांची सवाद्य मिरवुणकीसह जाऊन ओटी भरण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख गल्लीतून मिरवणूक निघून पेठगल्लीमार्गे सांबरा रस्त्यावरून निघालेल्या मिरवणुकीत भाविकांनी उदो गं आई उदो...चा गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत, लक्ष्मी माता की जय..च्या घोषात परिसर दणाणून सोडला. त्यानंतर बाळेकुंद्री गावातील हक्कदार, मंदिर कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांनी भक्तीपूर्ण वातावरणात सांबरा लक्ष्मीदेवीची ओटी भरली. यावेळी सांबरा गावातील दुर्गादेवी, कलमेश्वर, मारुती व इतर  मंदिरांना भेट देऊन ग्रामस्थांनी दर्शन घेतले. बाळेकुंद्री गावची लक्ष्मीदेवीची यात्रा जेंव्हा भरते त्यावेळी यात्रा भरणाऱ्या गावच्या वतीने देवीची ओटी भरण्याचा परंपरा रितीरिवाजाप्रमाणे चालून आली आहे. यावेळी सांबरा आणि बाळेकुंद्री देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, सुवासिनी उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article