जपानमध्ये टक्कल असलेल्यांचा क्लब
टक्कल असण्याचा जल्लोष करतात लोक
समाजात केसांना सुंदरतेचे प्रतीक मानले जते. केस गळण्याचा प्रकार अनेकदा लोकांच्या आत्मविश्वासाला कमी करत असतो. परंतु काही लोक टक्कल पडण्याला एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून स्वीकारत आहेत. एका देशात तर लोक टक्कल पडण्याचा जल्लोष करत आहेत आणि याकरता एक खास क्लबही स्थापन करण्यात आला आहे.
जपानमध्ये टक्कल पडण्यावरून एक वेगळाच दृष्टीकोन आहे. तेथील लोक टक्कल पडण्याचा प्रकार स्टाइल स्टेटमेंट म्हणून स्वीकारतात. याच मानसिकतेसोबत जपानमध्ये टक्कल असलेल्या लोकांसाठी क्लब स्थापन करण्यात आले आहेत. या क्लब्समध्ये लोक मिळून बाल्डनेसचा जल्लोष करतात. एकमेकांना प्रेरित करताता अणि समाजात बाल्डनेसवरून एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
बाल्डनेसमुळे अनेक लोकांचा आत्मविश्वास खालावत असतो. हा क्लब अशा लोकांना एक व्यासपीठ प्रदान करतो, जेथे ते स्वत:ला स्वीकारू शकतील आणि आत्मविश्वास वाढवू शकतील. हा क्लब जपानच्या समाजातील बाल्डनेसवरून असलेल्या नकारात्मक धारणा बदलण्याचा प्रयत्न करतो. बाल्डनेसमध्ये काहीच गैर नसल्याचे येथे लोकांना समजाविले जाते. या क्लब्समध्ये लोक परस्परांची साथ देतात, बाल्डनेसशी निगडित समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करतात. या क्लब्समध्ये पार्टी, खेळ, टूर इत्यादींचे आयोजन केले जाते.
जपानमध्ये आता बाल्डनेसवरुन सकारात्मक बदल दिसून येत आहे. अनेक जपानी सेलिब्रिटीज आणि यशस्वी व्यक्ती बाल्डनेसला अभिमानाने स्वीकारत आहेत. यामुळे लोकांमध्ये यासंबंधी एक सकारात्मक विचार विकसित होत आहे.