For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाल्को' प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची अवजारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

01:27 PM Oct 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
बाल्को  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची अवजारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

Advertisement

रत्नागिरीतील ‘बाल्को' प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी येथे सनदशीर मार्गाने या प्रकल्पग्रस्तांनी लढा देत आहेत. पण अजूनही त्यांच्या मागणीचा तिढा सुटत नसल्याने मंगळवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेती अवजारांसह मोर्चा काढला.

सन 1967 साली संपादीत केलेल्या शिरगाव-चंपक मैदान परिसरातील सुमारे 1200 एकर जमिनीच्या प्रश्नी शासन दखल घेईना अशी स्थिती उभी आहे. त्यासाठी मंगळवारी देखील प्रकल्पग्रस्तांनी येथील परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनो पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरातील जागेवर ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या या जमिन संपादीत केल्या. पण त्या जागांवर प्रकल्प आजमितीस उभा राहिलेला नाही. स्टरलाईट कंपनीच्या परिसरात असलेल्या त्या भूसंपादनामुळे भूमिहीन झालेले शेतकरी वेळोवेळी र्मोचे, आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.