महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहरात बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

10:43 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संघटनांनी शहर परिसरात ठाकरे यांची जयंती साजरी केली.

Advertisement

युवा म. ए. समिती

Advertisement

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीकांत कदम, गुंडू कदम, वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, आकाश भेकणे यासह इतर उपस्थित होते.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय

रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मारुती जोशीलकर, पांडुरंग जाधव, शिवराज पाटील, रविंद्र हुलजी यासह इतर उपस्थित होते.

शिवसेना सीमाभाग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने वृद्धाश्रमात मिठाई वाटून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन मिक्सर, ट्युबलाईट व मिठाई देण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, प्रकाश हेब्बाजी यासह इतर उपस्थित होते.

मंगाईनगर, वडगाव

मंगाईनगर रहिवासी संघटनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष बंडू केरवाडकर व श्रीधर बिर्जे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आनंद गोंधळी, किरण पाटील, मंगेश पोटे, शाम छत्रे यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article