हिंदुत्वाचे भगवे वादळ आजच्याच दिवशी शांत झाले
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन विशेष
संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर जगावर आजही ज्यांच्या अमोघ वक्तृत्त्वाचे गारुड आहे; ते राजकारणी म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर आज बाळासाहेबी ठाकरेंचा स्मृतिदिन. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, एक कुशल राजकारणी, पत्रकार, संपादक, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ता अशी अनेक विशेषणे मिरवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनात खास जागा आहे. बाळ केशव ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी, तर मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ साली झाला. आज शुक्रवार बाळासाहेबांचा स्मृतिदिन बाळासाहेबांचे आयुष्य खूप रोमहर्षक राहिले आहे.
बाळ ठाकरे यांचा जीवन प्रवास व्यंगचित्रकार म्हणून सुरू झाला. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रापासून त्यांनी सुरुवात केली. यानंतर १९६० मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत श्रीकांत ठाकरे यांच्या सोबत ‘मार्मिक’ नावाचे साप्ताहिक काढले. मार्मिक’नंतर सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची बाळासाहेबांनी स्थापना केली. पुढे मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय-अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. एक नारळ फोडून शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. त्यांचे वडील प्रबोधन ठाकरे यांनी पक्षाचे नाव शिवसेना ठेवले.
पक्षाच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी बाळासाहेबांनी मार्मिकमधून दसऱ्याला शिवाजी पार्कवर पहिला मेळावा होणार असल्याची घोषणा केली. मराठी माणसाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली होती. त्यानंतर मराठी माणसाचे प्रश्न सोडवणाऱ्या कित्येक सभा बाळासाहेबांनी फक्त शिवाजीपार्कवर नाही; तर ठिकठिकाणी घेतल्या. त्या सभा बाळासाहेबांनी आपल्या भाषणांनी गाजवल्या. त्यानंतर बाळा साहेब सभा आणि भाषणं गाजवत राहिले. बी
बाळासाहेबांचं जेव्हा निधन झालं. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. दोन दिवस मुंबई बंद होती. जगाच्या कानाकोपऱ्यातून पत्रकार बाळासाहेबांची अंत्ययात्रा कव्हर करण्यासाठी आले होते. देशातील नामवंत राजकारण्यांची उपस्थिती होती. म्हणजे दिवंगत बाळासाहेबांचं गारुड देशाच्या राजकारणावर किती होतं, याची कल्पना येईल. त्यांना राज्य सन्मानाने निरोप देण्यात आला. त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. अशा या नामवंत राजकारण्याला ११ व्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा.