महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उष:काल मित्र परिवारातर्फे बाळासाहेब काकतकरांचा वाढदिवस साजरा

11:24 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आयुष्यातील सगळे क्षण आठवणीत राहतात असे नाही. पण काही क्षण असे असतात की, जे विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाहीत. असाच हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी जमलेला जनसमुदाय हीच त्यांची ताकत आहे. असाच 100 वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला परमेश्वर देवो अशी सदिच्छा मराठा युवक संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांनी उष:काल मित्र परिवारातर्फे कोरे सर्कल कॅम्प येथे आयोजित मराठा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या गुरुवारी झालेल्या वाढदिनी दिली.

Advertisement

प्रारंभी कॅपिटल वन सोसायटीचे शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बाळासाहेब काकतकर यांचा केक कापून सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ मॉर्निंग वॉकर्स प्रकाश चौगुले, काका तेंडोलकर, महादेव मळीक, प्रकाश मरगाळे यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, सह्याद्री सोसायटीचे रघुनाथ बांडगी, मर्चंट सोसायटीचे चेअरमन नारायण किटवाडकर, बेकर्स सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंगिरकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

यावेळी उष:काल मित्र परिवाराचे सर्व सदस्य, मराठा बँकेचे संचालक शेखर हंडे, सुशिलकुमार खोकाटे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, मराठा मंदिरचे पदाधिकारी एन. बी. खांडेकर, विश्वास घोरपडे, बेळगाव हॉकी संघटनेचे गुंडाप्पा होसमणी, चाळके, मराठा युवक संघाचे पदाधिकारी चंद्रकांत मारुती देवगेकर, सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, तसेच अतुल पुरोहीत, महेश हणमशेट, महेश कुगजी, पी. के. जाधव, श्रीकांत देसाई, मिलिंद देशपांडे, अशोक जैनोजी, अनंत लाड, बापू जाधव, अविनाश पाटील, शरद पाटील, येतोजी मराठा बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर, आजी माजी कर्मचारी, जिजामाता बँकेचे मॅनेजर नंदकुमार आनदांचे इ. उपस्थित होते. तसेच दै. तरुण भारतचे समूहप्रमुख, सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर व केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनीही मोबाईलवरून बाळासाहेब काकतकर यांना शुभेच्छा दिल्या. सुहास किल्लेकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article