'यसबा करंडक’ बालाजी हायस्कूलने पटकावला
कलामहोत्सवात 16 संघांचा सहभाग
कलाशिक्षक मिलिंद यादव यांचा यसबा बालमित्र पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर
कोल्हापूर भूषण, चित्रपट दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांच्या सहाव्या स्मृतीदिन निमित्त आंतरशालेय कला महोत्सव 'यसबा करंडकचे आयोजन केले होते. चित्रकला, मातीकाम, एकपात्री, निबंधलेखन, समूह गायन, समूह नृत्य अश्या सहा कला प्रकारांमध्ये यश मिळवत बालाजी हायस्कूलने सलग दुसऱ्यांदा यसबा करंडक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण करण्यात आले. कलाशिक्षक मिलिंद यादव यांना यसबा बालमित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंतराव भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यसबा करंडक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठातील भाषा भवनमधील या महोत्सवात 16 शालेय संघांनी सहभाग नोंदवला होता. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची मुक्त उधळण केली. रंग यसबा गंध यसबा कलाविष्कारमध्ये युवा गायक संग्राम पाटील, निखिल मधाळे, गायिका रूचा गावंदे , वैष्णवी गोरड ,हर्षदा परीट यांनी देशभक्तीपर गाणी गायली गेली. गायकांच्या हस्ते पुरस्कार व बक्षीस वितरण करून बालकलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचे यसबा करंडकचे संकल्पक संग्राम भालकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. पी. टी. गायकवाड, जगन्नाथ लिधडे, चंदन मिरजकर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. टी. एम. चौगले, अॅड. स्वागत परुळेकर, किरण वाडकर, सचिन लाड, यशवंतराव भालकर फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव भालकर, संदिप जाधव, यसबा करंडक सदस्य भुषण पाठक, आशिष हेरवाडकर, आकाश लिगाडे, समर्थ जाधव, महेश चौगुले आदी उपस्थित होते.