महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बालाघाटचा सप उमेदवार काँग्रेसमध्ये सामील

05:51 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेश निवडणुकीत आघाडी करण्यास नकार दिल्यावर काँग्रेसने समाजवादी पक्षाला आणखी एक झटका दिला आहे. बालाघाट जिल्ह्यातील कटंगी मतदारसंघातील सपचे अधिकृत उमेदवार महेश सहारे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पक्षांतर केले आहे. सहारे यांनी आता निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

Advertisement

मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेससोबत आघाडीवरून निर्माण झालेल्या कटूतेनंतर समाजवादी पक्षाने मध्यप्रदेशात 42 उमेदवार उभे केले होते. यातील दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने अखिलेश यादव यांना झटका बसला आहे. महेश सहारे हे यापूर्वी भाजपमध्ये सव्रीय होते, अलिकडेच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळविली होती.  यापूर्वी समाजवादी पक्षाचे भिंड मतदारसंघातील उमेदवार रविसेन जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु जैन हे पूर्वी भाजपमध्येच होते, उमेदवारी न मिळाल्याने ते समाजवादी पक्षात दाखल झाले होते. यानंतर सपने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article