दादर येथे बाल कीर्तनकार महोत्सव
सातार्डा -
अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्यावतीने मुंबई - दादर ( पश्चिम ) डी. एल. वैद्य रोड येथे दिनांक 7 ते 15 मे या कालावधीत बाल कीर्तनकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील १४ व गोवा राज्यातील २ बाल कीर्तनकारांचा समावेश करण्यात आला आहे.बाल कीर्तनकार प्रत्येकी एक तास कीर्तन सादर करणार असून कीर्तन कालावधीमध्ये सायंकाळी 4 ते 6 : 15 या वेळेत श्रोत्यांसमोर कीर्तन सादर करण्यात येणार आहे.पहिल्या दिवशी गुरुवार दि 7 मे रोजी गोवा येथील समीक्षा कुर्टिकर व ईश्वरी कांदोळकर ,दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.8 मे रोजी नागपूर येथील कौमुदी साल्पेकर, तिसऱ्या दिवशी शनिवार दि 9 मे रोजी पुणे येथील आर्या परांजपे व अवनी परांजपे यांचे कीर्तन होणार आहे. चौथ्या दिवशी रविवार दि.10 मे रोजी नेरळ येथील आर्जवी वैद्य व मुंबई येथील स्वरा जगदाळे, पाचव्या दिवशी सोमवार दि 11 मे रोजी मुंबई येथील मुद्रा सावंत,सहाव्या दिवशी मंगळवार दि 12 मे रोजी नागपूर येथील देवव्रत देशपांडे व मुंबई येथील श्रुती सावंत यांचे कीर्तन होणार आहे.सातव्या दिवशी बुधवार दि.13 मे रोजी अकोला येथील स्मरण देशपांडे व आराध्या लक्रस, आठव्या दिवशी गुरुवार दि 14 मे रोजी अकोला येथील स्वरांगी व्हरसाळे व दीप कडू तसेच शेवटच्या नवव्या दिवशी शुक्रवार दि 15 मे रोजी पुणे येथील सर्वेशा चाकूरकर व रघुराज निमकर यांचे कीर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तनांचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.