For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळवडेत ९ एप्रिलला 'बाल आनंद मेळावा '

05:32 PM Apr 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तळवडेत ९ एप्रिलला  बाल आनंद मेळावा
Advertisement

त.भा.वार्ताहर
-------------------
न्हावेली : श्री म्हाळाई देवी कला क्रिडा मित्र मंडळ,तळवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी ' बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत असून तळवडे केंद्रातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.हा मेळावा गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता तळवडे नं.१ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात इयत्ता १ ली ते ७ वीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण,हस्ताक्षर आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत.तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध,सामान्य ज्ञान,चित्रकला आणि वक्तृत्व अशा स्पर्धाचा समावेश आहे.स्पर्धासाठी 'माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ' माझा मित्र ' पावसाळ्यातील गावाचे दृश्य ' ऑनलाईन शिक्षण विरुद्ध शालेय शिक्षण' तसेच पर्यावरणाला मदत ' असे विविध विषय निश्चित करण्यात आले आहेत.या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,विचारशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येक शाळेतून केवळ दोन विद्यार्थ्यांना एका स्पर्धेत सहभागी होता येणार असून एका विद्यार्थ्यांला जास्तीत जास्त दोन स्पर्धामध्ये सहभाग घेण्याची संधी दिली जाणार आहे.स्पर्धाचा कालावधीही निश्चित करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करुन सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या उपक्रमातून आपले कौशल्य सादर करावे असे आवाहन श्री म्हाळाई देवी कला क्रिडा मंडळ,तळवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.