महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भरपूर पावसासाठी मजगाव ग्रामस्थांचे बक्काप्पा देवाकडे साकडे

10:11 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /मजगाव

Advertisement

यावर्षी तरी भरपूर पाऊस पडू दे, बळीचे राज येवू दे...असे म्हणून श्री क्षेत्र बक्काप्पा देवस्थान खादरवाडी येथे जाऊन सोमवारी मजगावचे शेतकरी, पुरुष, महिलांनी गाऱ्हाणे घालून मागणी केली. खादरवाडीच्या पश्चिमेकडील डोंगरांच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र बक्काप्पा हे जागृत देवस्थान आहे. हे देवस्थान खादरवाडीच्या हद्दीत असले तरी त्यावर मजगाव, खादरवाडी, पिरनवाडी गावचा हक्क आहे. पारंपरिक पद्धतीने खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर या तिन्ही गावचे शेतकरी श्रीक्षेत्र बक्काप्पा देवस्थानला वाजतगाजत हर हर महादेवचा गजर करत जय जयकार करत बैलगाड्या, ट्रॅक्टर व इतर वाहनांनी शेतकरी तेथे जावून पोहचतात. अगदी निसर्गरम्य वातावरणात त्या ठिकाणी जावून पूजा-अर्चा करून महाप्रसाद तयार करून झाल्यावर भरीव पावसासाठी गाऱ्हाण्याचा कार्यक्रम होतो व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होते.

Advertisement

यावेळी मजगावहून सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी पुरूष-महिला बक्काप्पाला साकडे घालण्यासाठी गेले होते. यावेळी मजगावचे प्रमुख पंच-शिवाजी पट्टण, सुरेश मजुकर, बी. डी. कुडसुकूमार, गौरण्णा सावंत, पुजारी चंद्रकांत पुजारी, कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, देवेंद्र बस्तवाड, मलसर्ज सनदी, शितल वण्णूर, चंद्रकांत अनगोळकर, राजू सातेरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवाजी पट्टण म्हणाले, श्रीक्षेत्र बक्काप्पा देवस्थान हे पर्यटन क्षेत्र व्हावे. येथील रम्य वातावरण आणि परिसराचे संवर्धन व्हावे, अशी मागणी यावेळी केली. यासाठी तिन्ही गावच्यावतीने प्रयत्न करण्याचे ठरले. शितल वण्णूर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article