भारतात बजाज पल्सर एन 250 एसएस लाँच
दुचाकीत शक्तिशाली इंजिनसह अनेक नवीन वैशिष्ट्यो
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बाईक बजाज पल्सर एन 250 एसएस लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या नवीन बाईकमध्ये इंजिनपासून गिअरबॉक्स आणि डिजिटल क्रीनपर्यंत अनेक बदल केले आहेत. नवीन बजाज पल्सर एन 250 एसएसची किंमत एक्स-शोरूम 1,59,406 रुपये आहे. नवीन पल्सर ही सध्याच्या पल्सर एन 250 ची अद्ययावत आवृत्ती आहे.
बजाज पल्सर एन 250 एसएस लूक
बजाज पल्सर एन 250 एसएसच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकचे डिझाइन मागील मॉडेलप्रमाणेच स्पोर्टी ठेवण्यात आले आहे. बाईकच्या बॉडीवर शार्प लाइन्स आढळतात, ज्यामुळे तिला एक आकर्षक लूक मिळतो. तथापि, नवीन मॉडेलमध्ये नवीन रंग आणि ग्राफिक्स जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे तिला पूर्वीपेक्षा वेगळा लूक मिळतो.
बजाज पल्सर एन 250 एसएसची वैशिष्ट्यो
नवीन बजाज पल्सर एन 250 एसएसमध्ये आता जुन्या एलसीडी डिस्प्लेऐवजी 5-इंचाची टीएफटी क्रीन आहे. यामध्ये गुगल मॅप्सच्या मदतीने नेव्हिगेशन पाहता येते, ज्यामुळे प्रवासादरम्यान मार्ग समजणे सोपे होईल. या क्रीनमध्ये लॅप टायमर आणि वाहनाशी संबंधित कागदपत्रे ठेवण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
249 सीसीचे इंजिन
इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, बजाज पल्सर एन 250 एसएसला अद्ययावत 249सीसी इंजिन देण्यात आले आहे. यात एअर आणि ऑइल कूलिंग टेक्नॉलॉजी असून चार व्हॉल्व्ह मिळतात. हे इंजिन 25 एचपी पॉवर आणि 22 एनएम टॉर्क निर्माण करते.
