बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान कॉपरची तिमाहीत चांगली कामगिरी
जुलै-सप्टेंबर तिमाहीचा निकाल घोषित
वृत्तसंस्था/चेन्नई
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत बजाज फिनसर्व्ह आणि हिंदुस्थान कॉपर या दोन कंपन्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून दोन्ही कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही कंपन्यांचा वर्षाच्या आधारावर नफा वाढला असून उत्पन्नामध्येही चांगली प्रगती नोंदवण्यात आली असल्याचे सांगितले जाते. बजाज फिनसर्व्हने दुसऱ्या तिमाहीत 2244 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी हाच एकत्रित नफा 2087 कोटी रुपयांचा होता. याच तिमाहीत पाहता कंपनीने 37,403 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे, जे मागच्या वर्षी समान अवधीत 33,704 कोटी रुपयांचे होते.
हिंदुस्थान कॉपरला 186 कोटीचा नफा
दुसरीकडे धातू क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान कॉपरने दुसऱ्या तिमाहीमध्ये 186 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 102 कोटी रुपयांचा एकत्रित नफा कंपनीने प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीने 718 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. जे मागच्या वर्षी समान अवधीत 518 कोटी रुपयांवर होते.