For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज चेतक ब्लू 3202 ईव्ही स्कूटर लाँच

06:23 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बजाज चेतक ब्लू 3202 ईव्ही स्कूटर लाँच
Advertisement

फुल चार्जवर धावणार 137 किमी : ओला एस1 प्रोसोबत स्पर्धा : किंमत 1.15 लाख रुपये

Advertisement

नवी दिल्ली :

बजाज ऑटोने लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक ब्लू 3202 स्पेशल एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 137 किमी प्रवास करू शकते. त्याची किंमत 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम बंगलोर, इएमपीएस-2024 योजनेसह) आहे.

Advertisement

नवीन चेतक ब्लू 3202 ची किंमत अर्बन व्हेरियंटपेक्षा 8,000 रुपये कमी आहे आणि प्रीमियम ट्रिमच्या बरोबरीने आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही 2,000 रुपये टोकन रक्कम भरून गाडी बुक करू शकता. अॅथय रिझटा, ओला एस 1 प्रो आणि टीव्हीएस आय क्लब या मॉडेल्सना टक्कर देणार आहे.

डिझाइन आणि रंग पर्याय

इलेक्ट्रिक स्कूटरची 3202 आवृत्ती 4 रंगांच्या पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. यात ब्रुकलिन ब्लॅक, सायबर व्हाईट, इंडिगो मेटॅलिक आणि मॅट कूर्स ग्रे कलरचा समावेश आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच स्टील बॉडीसह गाडीचे डिझाइन असेल.

यात लांब आसने, बॉडी कलर रीअर ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि मॅचिंग पिलियन फूटरेस्ट कास्टिंग आणि चारकोल ब्लॅक फिनिश ते हेडलॅम्प केसिंगसह येते. इलेक्ट्रिक स्कूटर डिस्क ब्रेक, अलॉय व्हील, एलईडी डीआरएलसह एलईडी लाइटिंग, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, आयपी67 वॉटरप्रूफिंगसह येते.

बजाज चेतक 2901 मध्ये अर्बन व्हेरियंट प्रमाणे मागील बाजूस ट्रायलिंग लिंक सस्पेन्शन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन आहे.

ईव्हीमध्ये अॅप कनेक्टिव्हिटी पर्याय, ओटीए अपडेट्स आणि युएसबी चार्जिंग पोर्ट समाविष्ट आहे.

Advertisement
Tags :

.