बजाज ऑटोच्या महसूल, नफ्यात विक्रमी वाढ
06:59 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
दुचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने आपला आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल आणि नफा प्राप्त केला आहे. डिसेंबर तिमाहीअखेर संपलेल्या कालावधीमध्ये बजाज ऑटोने 25 टक्के वाढीसह 2749 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे तर याच तिमाहीत महसुलामध्ये 23 टक्के वाढ नोंदवली असून तो 16 हजार 204 कोटी रुपयांवर पोहचला आहे. उत्सवीकाळासोबतच जीएसटीमध्ये केलेला स्वागतार्ह बदल यामुळे सर्व प्रकारातील वाहन विक्रीमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
सुधारीत पल्सर चमकली
Advertisement
बजाज ऑटोने अलीकडेच आपली प्रसिद्ध पल्सर ही नव्याने अनेक बदल करत सादर केली आहे. पल्सर या सुधारीत आवृत्तीच्या दुचाकीला ग्राहकांनी तुडुंब प्रतिसाद नोंदवला.
Advertisement