For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज ऑटोची नवी ‘पल्सर एन 160 एस’ लाँच

06:28 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
बजाज ऑटोची नवी  ‘पल्सर एन 160 एस’ लाँच
Advertisement

1 लाख 34 हजार किंमत  : नव्या दमदार इंजिनची जोड

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जर का आपण नवी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी बजाजने आपली नवी पल्सर सादर केलेली आहे. बजाज ऑटोने ‘पल्सर एन 160 एस“ ही नवी बाईक लाँच केली आहे. या गाडीचे किंमत 1,34,000 रुपयांपासून पुढे सुरु होते. कंपनीने दोन प्रकारात ही गाडी लाँच केलेली आहे. दोन्ही गाड्यांना 165 सीसीचे इंजिन असणार आहे. या गाडीच्या इंजिनमध्ये बदल करण्यात आला आहे.

Advertisement

दमदार इंजिनचा आधार

बाईकमध्ये आता 4 व्हॉल्वचे 165 सीसीचे इंजिन असेल. जे 9500 आरपीएमवर 18.24 एचपीची उर्जा निर्माण करेल. या आधीच्या जुन्या मॉडेलमध्ये कंपनीने दोन

व्हॉल्वचे इंजिन दिले होते. याचाच अर्थ नव्या इंजिनमुळे बाईकला अधिक ऊर्जा क्षमता प्राप्त झालेली आहे. चांगल्या दमदार कामगिरीसाठी इंजिनचे सहकार्य भरीव असणार आहे. कंपनीने इंजिनच्या कुलिंग प्रणालितही सुधारणा केली आहे. पूर्वीच्या एअरकुल्ड सिस्टिमच्या जागी आता ऑईलकूल्ड सिस्टिम प्रणाली दिली जाणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरची नवी गाडी 0 ते 60 कि.मी. प्रति तास इतका वेग केवळ 4.5 सेकंदात घेईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या पल्सर गाडीला दिलेले इंजिन हे आतापर्यंतचे सर्वात मजबूत क्षमतेचे आहे.

Advertisement
Tags :

.