बजाज ऑटोचे बाजार भांडवल 2 लाख कोटी पार
नवी दिल्ली
ऑटो मोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोचे बाजार भांडवल मूल्य मंगळवारी 2 लाख कोटी रू. चा टप्पा पार करू शकले आहे. पहिल्यांदाच हा टप्पा कंपनीने प्राप्त केला असून बायबॅकच्या घोषणेनंतर समभाग शेअरबाजारात चांगलाच वधारलेला पहायला मिळाला.
बजाज ऑटोचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटी रूपयांवर पोहोचले आहे. संचालक मंडळाने या दरम्यान 10 हजार रू प्रति समभागवर 4 हजार कोटी रूपयांच्या शेअर्स बायबॅकला मंजूरी दिली आहे. दुचाकी आणि तिनचाकी वाहन निर्माती कंपनी बजाज ऑटोचा समभाग मंगळवारी 6 टक्के वाढत 7420 रूपयांची नवी उच्चांकी गाठण्यामध्ये यश मिळवू शकला आहे.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत पाहता बजाज ऑटोच्या समभागांनी 105 टक्के इतका दमदार परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. या तुलनेमध्ये याच अवधीत एसअॅण्डपी बीएसई सेन्सेक्स 18 टक्के आणि बीएसई ऑटो निर्देशांक 43 टक्के वाढलेला होता.