For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज ऑटोची जूनमध्ये वाहन विक्री दमदार

07:00 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बजाज ऑटोची जूनमध्ये वाहन विक्री दमदार
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

देशातील प्रमुख ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने जूनमध्ये दमदार वाहन विक्री नोंदवली आहे. कंपनीची एकूण विक्री 28 टक्के वाढत 4 लाख 63 हजार 202 वर पोहचली आहे. मागच्या वर्षी जून 2025 मध्ये कंपनीने 3 लाख 60 हजारहून अधिक वाहनांची विक्री केली होती. महत्त्वाचे म्हणजे देशांतर्गत बाजारासह विदेशातील बाजारातही वाहनांची मागणी मजबूत राहिली होती. देशांतर्गत बाजारात दुचाकी व व्यावसायिक वाहन मिळून एकंदर 2 लाख 9 हजार 837 वाहनांची विक्री जूनमध्ये झाली आहे. जून 2025 मध्ये हीच विक्री 1 लाख 88 हजार 460 इतकी होती. त्या तुलनेत वाहन विक्रीत 11 टक्के वाढ झाली.

निर्यात वाढली

Advertisement

जून महिन्यात बजाज ऑटोने निर्यातीतही चांगले प्रदर्शन केले. कंपनीने एकूण 2 लाख 53 हजार 365 वाहनांची निर्यात केली आहे. वर्षापूर्वी याच महिन्यात कंपनीने 1 लाख 72 हजार 346 वाहनांची निर्यात केली होती. कंपनीची निर्यात जवळपास 47 टक्के अधिक दिसून आली. विदेशी बाजारातही बजाजच्या वाहनांना ग्राहकांची पसंती वाढत आहे. जून 2026 मध्ये कंपनीने 3 लाख 89 हजार 395 एकंदर दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत पाहता विक्री 30 टक्के अधिक राहिली आहे.

मोटरसायकल, स्कूटर्सना विदेशात मागणी

देशांतर्गत बाजारात दुचाकी विक्री 12 टक्के वाढीसह 1 लाख 66 हजार 956 इतकी झाली आहे तर निर्यातीसाठी वाहनांची विक्री 49 टक्के वाढीसह 2 लाख 22 हजार 439 इतकी होती. याचाच अर्थ कंपनीच्या मोटरसायकल व स्कूटर वाहनांना विदेशात चांगली पसंती मिळत आहे. कमर्शियल वाहनांच्या गटात जून 2026 मध्ये 73,807 वाहनांची विक्री कंपनीने केलीय. मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 18 टक्के विक्री वाढीव पाहायला मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.