For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज ऑटोच्या नफ्यात बंपर वाढ, 3225 कोटीचा नफा

06:42 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बजाज ऑटोच्या नफ्यात बंपर वाढ  3225 कोटीचा नफा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

देशातील ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने आपल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. नफ्यात कंपनीने बंपर वाढ नोंदवली असल्याचे बोलले जात आहे. नफ्यासोबत महसुलातही चांगली कामगिरी कंपनीने केली आहे.

आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत दुचाकीसह तिचाकीची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने 3225.63 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे.

Advertisement

मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत नफा 45 टक्के अधिक आहे. एप्रिल ते जून अवधीत बजाज ऑटोचा कामकाजी महसूल मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 65 टक्के वाढला आहे. कंपनीने या अवधीत 21,688 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. वर्षाआधी एप्रिल ते जून अवधीत कंपनीने 13133 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

22 हजार कोटींचे उत्पन्न

कंपनीने याअवधीत 22376 कोटींचे उत्पन्न प्राप्त केले तर एकूण खर्च 68 टक्के वाढत 17949 कोटी रुपयांवर पोहचला होता. कच्चा माल व सुटे भाग यासाठीचा खर्च 8041 कोटींवरुन 13,261 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

Advertisement
Tags :

.