बजाज ऑटो केटीएम खरेदीसाठी उत्सुक
06:38 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पुणे :
Advertisement
बजाज ऑटो लिमिटेडची संपूर्ण मालकी असणारी सहकारी कंपनी बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंग यांनी आर्थिक संकटात असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील बाईक निर्माती कंपनी केटीएममध्ये जास्तीत जास्त हिस्सेदारी खरेदी करण्याची योजना बनवली आहे. पुण्याची असणारी बजाज ऑटो यांनी 2007 मध्ये केटीएममध्ये भागीदारी घेतली होती, त्यावेळी कंपनीची केटीएममध्ये 14.5 टक्के इतकी हिस्सेदारी होती. सध्याला पाहता बजाज ऑटोची एकंदर हिस्सेदारी 37.5 टक्के इतकी आहे. बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंग हिस्सेदारी खरेदीसाठी 7765 कोटी रुपये देण्याची तयारी करत आहे. यायोगे केटीएममधील हिस्सेदारी कंपनी वाढवणार आहे. केटीएम भारतामध्येही आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असून 80 देशांना कंपनी आपल्या निर्मिलेल्या मोटारसायकलींची निर्यात करते.
Advertisement
Advertisement