महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बजाज ऑटोने कमावला 2011 कोटी रुपयांचा निव्वळ नफा

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : भारतातील दिग्गज दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. आर्थिक 2024 च्या चौथ्या तिमाहीत बजाज ऑटोने 2011 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या दरम्यान बजाज ऑटोचे समभाग बीएसईवर गुरुवारी 1.61 टक्के वाढत 9,062 रुपयांवर व्यवहार करत होते. अनेक तज्ञांनी बजाज ऑटोला 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. देशांतर्गत बाजारामध्ये कंपनीच्या मोटारसायकलचा खप मोठ्या प्रमाणात राहिला आहे. कंपनीने या तिमाहीमध्ये निर्यातीत देखील चांगली कामगिरी नोंदवली आहे. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने 11,554 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीत कंपनीने 9,192 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ नोंदवली गेली आहे. 11,914 कोटी रुपये उत्पन्नाच्या माध्यमातून कंपनीने प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीच्या पदरात 9,192 कोटी रुपये पडले होते. संपूर्ण 2024 च्या आर्थिक वर्षात 46,087 कोटी रुपये उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. कंपनीने 80 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article