बजाज ऑटोनेही केल्या किमती कमी
नवी दिल्ली :
देशातील ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोनेही आपल्या वाहनांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रात कंपनीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. सरकारने अलीकडेच जीएसटी दर कमी केल्याने याचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी कंपन्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
कंपनीने मोटरसायकलवर ग्राहकांना 20 हजार रुपयांची सवलत तर तीनचाकी वाहनांवर 24 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, सरकारचा जीएसटी कपात करण्याचा निर्णय साहसपूर्ण म्हटला पाहिजे. यामुळे आगामी काळात मागणी वाढणार असून उद्योगाच वाढीसाठी चालना मिळणार आहे. दर घोषणेनंतर कंपनीने सवलतीचा लाभ मिळवून देण्याची तयारी अंतिम केली आहे. जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर छोट्या कार्स, 350 सीसीपर्यंतच्या मोटरसायकल्स, तीन चाकी वाहने, बस, ट्रक्स आणि अॅम्ब्युलन्सवर जीएसटी दर 28 वरुन 18 टक्के करण्यात आला आहे.