For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बायंगिणीतील कास्टिंग साइटची पाहणी; धूळ आणि ध्वनी प्रदूषणाबाबत स्थानिकांच्या तक्रारी

01:38 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बायंगिणीतील कास्टिंग साइटची पाहणी  धूळ आणि ध्वनी प्रदूषणाबाबत स्थानिकांच्या तक्रारी
Advertisement
 बायंगिणी : बॉम्बे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानंतर बायंगिणी येथील कास्टिंग साइटची आज नगर व नगरनियोजन विभाग (टीसीपी) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी संबंधित कंत्राटदार आणि जागामालकही उपस्थित होते.

या प्रकरणी टीसीपी विभागाने उद्यापर्यंत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी कास्टिंग साइटची पाहणी केली. यावेळी तक्रारदार दोघे आणि त्यांचे वकीलही उपस्थित होते.

Advertisement

बायंगिणी येथील या साइटमुळे परिसरात असह्य धूळ आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर झालेल्या या पाहणीकडे स्थानिकांचे लक्ष लागले असून, टीसीपी विभाग न्यायालयात सादर करणार असलेल्या प्रतिज्ञापत्रात काय भूमिका मांडतो, याकडेही लक्ष असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.