बायणा फ्लायओव्हरवर कार कलंडली; चालक जखमी
03:54 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वास्को : बायणा फ्लायओव्हरवर आणखी एक अपघात घडला असून, स्विफ्ट कार कलंडल्याने चालकासह कारमधील एका कुत्र्यालाही दुखापत झाली. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बायणा फ्लायओव्हरवरून जात असताना स्विफ्ट कार अचानक कलंडली. या अपघातात कार चालवत असलेली व्यक्ती जखमी झाली. कारमध्ये असलेल्या कुत्र्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर चालकाला तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्यालाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. बायणा फ्लायओव्हरवर वारंवार अपघात घडत असल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Advertisement
Advertisement
