For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खर्गे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

06:43 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
खर्गे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी
Advertisement

बजरंग दलाची तुलना पीएफआयशी केल्याचे प्रकरण

Advertisement

► वृत्तसंस्था

संगरूर

Advertisement

पंजाबमधील संगरूर येथील एका न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खर्गे यांना 19 सप्टेंबर 2026 रोजी व्यक्तिश: न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार, खर्गे यांना व्यक्तिश: हजर राहून जामीन मिळवावा लागेल. हे प्रकरण 2023 सालचे आहे. संगरूरचे रहिवासी आणि बजरंग दलाशी संबंधित हितेश भारद्वाज यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने ही कारवाई केली आहे. या तक्रारीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या वक्तव्याचा उल्लेख असून त्यात त्यांनी बजरंग दलाची तुलना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी (पीएफआय) केली होती. तसेच काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याची धमकीही त्यांनी दिली होती.

न्यायालयाने मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात 15,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सुरुवातीला हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे मानले जात होते, परंतु आता न्यायालयाने ते फौजदारी प्रकरण मानून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे 19 सप्टेंबर रोजीच्या पुढील सुनावणीच्या तारखेला हजर राहिले नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटजारी केले जाऊ शकते, असे  न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.