For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाई सावंत याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

03:55 PM Apr 11, 2025 IST | Radhika Patil
भाई सावंत याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणातील आरोपी असलेला पती सुकांत उर्फ भाई सावंत याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल़ा खूनप्रकरणात मागील दोन वर्षाहून अधिक काळ कारागृहात असलेल्या भाई सावंत याच्याकडून जामिनासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होत़ा रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाल़ी

स्वप्नाली सावंत हिचा 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप पती सुकांत उर्फ भाई सावंत, रूपेश उर्फ रूप्या कमलाकर सावंत व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (ऱा सर्व मिऱ्या बंदर, रत्नागिरी) यांच्यावर ठेवण्यात आला आह़े जामीन अर्जावरील सुनावणीवेळी भाई सावंत याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, गुह्याचे दोषारोपपत्र न्यायालयापुढे ठेवण्यात आले असून खटला सुऊ आह़े स्वप्नाली सावंत यांच्या आईने आकसापोटी भाई सावंत याच्याविऊद्ध तक्रार दाखल केली आह़े संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आह़े तसेच स्टेशन डायरी पाहिल्यास पोलिसांच्या तपासात उणिवा असल्याचे दिसून येत़े आतापर्यंत 12 साक्षीदार तपासण्यात आले आहेत़ आरोपीला जामीन दिल्यास तो अटींचे पालन करेल, असे सांगण्यात आल़े

Advertisement

तर सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपीविरूद्ध सबळ पुरावे आढळून आले आहेत़ आरोपी भाई सावंत याच्याविऊद्ध 10 गुन्हे दाखल आहेत़ तसेच स्वप्नाली सावंत हिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही भाई सावंत याच्याविऊद्ध दाखल आह़े त्या गुह्याचा खटला रत्नागिरी न्यायालयापुढे सुऊ आह़े आरोपी राजकीय व्यक्ती असून तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकत़ो यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आल़ी

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, खटल्यातील साक्षी पुरावे तपासावयाचे आहेत़ त्यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार व साक्षी पुरावे या बाबत आताच कोणतेही मत व्यक्त करता येणार नाह़ी प्रथमदर्शनी आरापीविऊद्ध खटला चालविण्यासाठीचे पुरावे असल्याचे दिसून येत आह़े तसेच आरोपीविऊद्ध पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणीही खटला सुरू आह़े वरील सर्व कारणांचा विचार करताना आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात सांगितल़े सरकारी पक्षाकडून अॅड़ प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिल़े

Advertisement
Tags :

.