For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना जामीन मंजुर

01:35 PM Nov 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना जामीन मंजुर
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणामधील संशयित धोंडीबा उर्फ निलेश राजाराम नार्वेकर,रा. खालचीवाडी , सांगेली आणि संतोष विठ्ठल म्हालटकर , रा .बामणादेवी माडखोल ता , सावंतवाडी या दोघांना ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर आणि ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ६ जणांविरोधात पोक्सो POCSO ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती . संशयित धोंडीबा नार्वेकर व संतोष म्हालटकर यांच्यावतीने ॲड. अनिल निरवडेकर यांनी न्यायालयातकेलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती . या दोघा संशयितांना जामीन साठी मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता . सदर अर्जाची सुनावणी होऊन व ॲड. अनिल निरवडेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा न्यायाधीश सानिका जोशी यांनी दोन्ही आरोपींना प्रत्येकी पन्नास हजाराच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली .

Advertisement

Advertisement
Tags :

.