For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहराइच हिंसा : बुलडोझर कारवाईला स्थगिती

06:22 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहराइच हिंसा   बुलडोझर कारवाईला स्थगिती
Advertisement

आरोपींच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बहराइच हिंसा प्रकरणातील तीन आरोपींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सुनावणी करणार आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाईला स्थगिती दिली आहे. उत्तरप्रदेश सरकारने देखील बुधवारपर्यंत कुठलीच कारवाई न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले आहे.

Advertisement

उत्तरप्रदेश सरकारकडून अवैध बांधकामाप्रकरणी संबंधितांना नोटीस जारी केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सी.यू. सिंह यांनी न्यायाधीश बी.आर. गवई आणि पे.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर याचा उल्लेख करत तत्काळ सुनावणीची मागणी केली. राज्य सरकारने नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत दिली असल्याचे वकिलाने म्हटले. उत्तरप्रदेश सरकारने आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचे जोखीम पत्करण्याची इच्छा बाळगली असल्यास ती त्यांची मर्जी असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करत नोटीसला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिल्याचे उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के.एम. नटराज यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयाने कुठलेच संरक्षण दिले नसल्याचा युक्तिवाद केला. यावर खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना बुधवारपर्यंत कुठलीच कारवाई न करण्याचे तोंडी स्वरुपात सांगितले.

बहराइच येथील महाराजगंमध्ये हिंसा झाली होती. या हिंसेदरम्यान गोळी लागल्याने राम गोपाल मिश्रचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सांप्रदायिक हिंसा भडकली होती. यामुळे तेथे तोडफोड तसेच जाळपोळीचा प्रकार घडला होता. तसेच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Tags :

.